Tuesday, June 25, 2024 11:03:53 AM

Minister Mohola's video on Father's Day goes viral
फादर्स डे निमित्त मंत्री मोहोळांचं व्हिडिओ व्हायरल …

मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मुलींसोबत पोस्ट केलेला व्हिडिओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

फादर्स डे निमित्त मंत्री मोहोळांचं व्हिडिओ व्हायरल …
Murlidhar Mohol

पुणे :  नुकताच लोकसभा निवडणूकीचा निकाल जाहीर झाला. पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून खासदार म्हणून मुरलीधर मोहोळ यांची वर्णी लागली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी त्यांना मंत्रिपद मिळालं. या सगळ्या गडबडीत मोहोळ बरेच दिवस घरापासून लांब होते. घरी गेल्यावर त्यांच्या मुली त्यांना बिलगून भावूक झाल्या. त्याचा व्हिडिओ मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटर या समाजमाध्यमावर पोस्ट केला आहे. लेकींची माया भोळी.. बाप आभाळासारखा असं कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिले आहे.

 

मंत्री झालेल्या बापाच्या कुशीत शिरताना मुलींना त्यांचे रडू आवरले नाही आणि त्या मुलींकडे पाहून मोहोळ भावूक झालेले दिसून आले. मंत्री मुरलीधर मोहोळांनी पोस्ट केलेल्या या व्हिडिओला प्रचंड प्रेम मिळत आहे. आज फादर्स डे च्या निमित्ताने मोहोळ यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून बाप लेकीचं प्रेम किती अतूट असते हे दिसून येते.


सम्बन्धित सामग्री