Sunday, September 08, 2024 07:16:18 AM

Marriage of Mahavikas Aghadi and Mahayuti
महाविकास आघाडी आणि महायुतीचे लग्न

सकल मराठा समाजाकडून भूम येथे महाविकास आघाडी आणि महायुतीचे प्रतिकात्मक लग्न लावत आगळं वेगळं आंदोलन करण्यात आलं. राजकीय नेत्याचे मुखवटे घालून लग्न लावण्यात आले.

महाविकास आघाडी आणि महायुतीचे लग्न 
mahayuti, mahavikas aghadi

२५ जुलै, २०२४, धाराशिव : सकल मराठा समाजाकडून भूम येथे महाविकास आघाडी आणि महायुतीचे प्रतिकात्मक लग्न लावत आगळं वेगळं आंदोलन करण्यात आलं. राजकीय नेत्याचे मुखवटे घालून लग्न लावण्यात आले.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गुरुवारी २५ जुलै, २०२४ रोजी धाराशिव जिल्ह्यातील भूम येथे मराठा समाजाच्यावतीने एक अनोखे आंदोलन करण्यात आलं.  या आंदोलनामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती यांचे प्रतीकात्मक लग्न लावण्यात आले. सत्तेतल्या आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांचे मुखवटे लावून मंगलाष्टका म्हणत हे लग्न पार पडलं. भूम शहरातील गोलाई चौकात हे प्रतीकात्मक लग्न आंदोलन पार पडलं. या आगळ्यावेगळ्या आंदोलनाने शहरवासीयांचे लक्ष वेधलं होतं.

या आंदोलनामध्ये छगन भुजबळ, शरद पवार, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, निलेश राणे, चंद्रकांत पाटील आदी नेत्यांचे मुखवटे आंदोलकांनी आपल्या चेहऱ्यावर लावले होते. शहरातून मिरवणूक काढत हे आंदोलन करण्यात आले.


सम्बन्धित सामग्री