मुंबई : कल्याणमधील सोसायटीत राहणाऱ्या मराठी कुंटुंबावर अत्यंत क्षुल्लक कारणाने झालेल्या हल्ल्याचे प्रकरण आता चांगलेल तापले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी अशा माजोरड्या व्यक्तिंवर कारवाई कऱण्याचे निर्देश दिले असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी समाजमाध्यमावर पोस्ट करत मराठी माणसांना जागे होऊन अशी पिलावळ वेळीच ठेचून काढण्याचे आवाहन केलं आहे.
काय आहे राज ठाकरेंची पोस्ट?
'महाराष्ट्रात असे अनेक महाराष्ट्रद्वेषी शुक्ला, गुप्तपणे राहत आहेत. मध्यंतरी गिरगावमध्ये घडलेली घटना असो की ही कल्याणमधली'
'प्रत्येकवेळेला हे असले महाराष्ट्रद्वेषी मराठी माणसाचा कणा तपासून बघत असतात आणि अजून किती तुम्हाला वाकवता येईल हे बघत असतात'
'आज कित्येक पिढ्या इथल्या मातीत मिसळून राहिलेले असंख्य अमराठी माणसं आहेतच'
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
'पण ही जी महाराष्ट्रद्वेषींची नवीन पिलावळ इथे गेले काही वर्ष वळवळायाला लागली आहे, ज्यांचा डोळा इथल्या जमिनीवर आहे, त्यांना वेळीच ठेचलं पाहिजे'
'मराठी माणसा आता तरी जागा हो, अन्यथा हे तुमच्या पायाखालची जमीन कधी खेचतील आणि कधी तुम्ही नेस्तनाबूत व्हाल हे समजणार पण नाही!'
'आरोपीना कायद्याचा धाक काय असतो ते एकदा दाखवा. आणि जर सरकारला जमत नसेल, तर मग महाराष्ट्र सैनिकांनी थैमान घातलं तर आमच्याकडे बोट दाखवू नका'
- राज ठाकरे
हेही वाचा : मराठी माणसावर अन्याय होऊ देणार नाही - फडणवीस