Thursday, June 27, 2024 08:32:16 PM

Manoj Jarange
जरांगे आखतायत निवडणुकीचे डावपेच

आंदोलन करणारे समर्थक विधानसभेची निवडणूक लढवतील, असे मनोज जरांगे यांनी जाहीर केले आहे.

जरांगे आखतायत निवडणुकीचे डावपेच

छत्रपती संभाजीनगर : सग्यासोयऱ्यांना सरसकट आरक्षण मिळावे अशी मागणी करत मनोज जरांगे यांनी राज्य शासनाला १३ जुलैपर्यंतची मुदत दिली आहे. सरकारने मागण्या मान्य केल्या नाही तर आंदोलन करणारे समर्थक विधानसभेची निवडणूक लढवतील, असे मनोज जरांगे यांनी जाहीर केले आहे. विधानसभेच्या निवडणुकीसाठी १२७ मतदारसंघात आढावा घेऊन झाला आहे, असेही जरांगे म्हणाले. मराठा, मुसलमान, दलित आणि लिंगायत मतदारांची मोट बांधून निवडणूक लढवू, असेही जरांगे यांनी सांगितले.


सम्बन्धित सामग्री