Friday, April 11, 2025 10:57:09 PM

मविआला उत्तर देण्यासाठी महायुतीचे प्रत्युत्तर

महायुतीकडून रविवारी राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे.

मविआला उत्तर देण्यासाठी महायुतीचे प्रत्युत्तर

मुंबई : महायुतीकडून रविवारी राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. मालवणमधील शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मविआने राज्यभर आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला उत्तर देण्यासाठी महायुतीकडून आंदोलन करण्यात येत आहे. सिंधुदुर्ग घटनेबद्दल माफी मागून सुद्धा मविआ आंदोलन करत आहे त्याचा निषेधार्थ महायुतीकडून आंदोलन केले जात आहे. रविवारी सकाळी ९ वाजल्यापासून आंदोलनाला सुरूवात झाली आहे. महायुतीने आंदोलनाला आंदोलनाने उत्तर दिले आहे. नागपूर येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, संभाजीनगरात मंत्री अतुल सावे आणि भागवत कराड तर सिंधुदुर्ग येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे या महायुतीच्या नेत्यांकडून आंदोलन केले जात आहे. 


सम्बन्धित सामग्री