Thursday, March 27, 2025 04:29:05 PM

सहा जूनला जे.पी.नड्डा यांचा कार्यकाळ संपणार

लोकसभा निवडणुकीनंतर भाजपात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचा कार्यकाळ सहा जून रोजी संपणार आहे.

सहा जूनला जेपीनड्डा यांचा कार्यकाळ संपणार

मुंबई :  लोकसभा निवडणुकीनंतर भाजपात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचा कार्यकाळ सहा जून रोजी संपणार आहे. तर लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अवघ्या दोन दिवसात भाजपा अध्यक्ष बदलून नवा अध्यक्ष देणार का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांना दुसऱ्यांदा संधी मिळणार का ? कि दुसऱ्या चेहऱ्याला राष्ट्रीय अध्यक्षपद मिळेल. हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. जे.पी.नड्डा यांना दोन वेळा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद मिळाले आहे. आता तिसऱ्यांदाही नड्डा यांना अध्यक्ष पद मिळणार का ? या प्रश्नाला सहा जूननंतर पूर्णविराम मिळणार आहे.

              

सम्बन्धित सामग्री