जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी सकाळी १० वाजल्यापासून आमरण उपोषणाला सुरूवात केली आहे. जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे जरांगे उपोषणाला बसले आहेत. सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला सुरूवात केली आहे. मात्र पोलिसांनी या आंदोलनास परवानगी नाकारली होती तरी जरांगे पाटील आंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. आम्ही आंदोलन स्थगित केले होते. नव्याने परवानगीची गरज नाही असे त्यांनी म्हटलं आहे. तर गावात कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी १०० पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
सगेसोयऱ्यांची मागणी तात्काळ पूर्ण करा तसेच कारण नसताना आंदोलनाला परवानगी नाकारली असे आंदोनालाच्या सुरूवातीलाचा जरांगे पाटील म्हणाले. मराठ्यांना ठरलेले आरक्षण द्या, डोक्यावर घेऊन नाचू असे आवाहनही त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले. त्याचबरोबर आरक्षण न दिल्यास विधानसभेत २८८ उमेदवार देऊ. आता विधानसभेत नाव घेऊन पाडू असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला आहे.