Wednesday, December 11, 2024 08:51:30 PM

Winter session in Nagpur
हिवाळी अधिवेशनाची जोरदार तयारी

हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबरला सुरू होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

हिवाळी अधिवेशनाची जोरदार तयारी

नागपूर : राज्यात हिवाळी अधिवेशन नागपुरात पार पडते. नागपुरात हिवाळी अधिवेशनाची जय्यत तयारी सुरू आहे.  राज्यात नवे सरकार स्थापन झाले नसल्यामुळे हिवाळी अधिवेशनाची तारीख अधिकृत जाहीर करण्यात आली नाही. परंतु हिवाशी अधिवेशन 16 डिसेंबरला सुरू होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. हिवाळी अधिवेशन 16 डिंसेबर ते 21 किंवा 24 डिसेंबरपर्यंत असण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हिवाळी अधिवेशन आठवडाभर चालणार असल्याची माहिती आहे. राज्यात नवे सरकार स्थापन होईल. त्यानंतर हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर होईल. हिवाळी अधिवेशन कधी जाहीर होईल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

 

नागपूर जिल्ह्यातील हिवाळी अधिवेशनासाठी नवीन इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीच्या रंगरंगोटी, साफसफाईसाठी 5 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.  हिवाळी अधिवेशनात येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या निवास व्यवस्थेबाबत विधिमंडळ सचिवालयाने सूचना काढली आहे. कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी 160 खोल्या उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. मात्र, त्या पुरेशा नसल्याने एका खोलीत चार ते पाच अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मुक्कामाचे नियोजन सचिवालयाने केले आहे. कारण नागपुरातील बांधकाम विभागाकडे मुंबईहून अधिवेशनासाठी येणाऱ्या सचिवालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निवासव्यवस्थेची जबाबदारी असते. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे राहण्याचे नियोजन सचिवालयाने अशा प्रकारे केले आहे. तर, विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी मंत्र्यासाठी स्वतंत्र बंगले, सचिवांसाठी स्वतंत्र व्यवस्था केला जाते.

 

 

 


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo