सिंधुदुर्ग : भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचा कार्यकाळ ६ जून रोजी संपला.पण तिसऱ्यांदाही नड्डाचं अध्यक्ष राहतील अशी चर्चा माध्यमांमध्ये होती. त्यादरम्यान लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात जगतप्रकाश नड्डा यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर भाजपाच्या राष्ट्रीय अध्यपदी कोणाची वर्णी लागणार हा मुद्दा उपस्थित झाला. त्यानंतरच भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी विनोद तावडे यांचे नाव चर्चेत आहे.
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व भाजपा नेते रविंद्र चव्हाण यांना भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी विनोद तावडे यांचे नाव चर्चेत असल्याचा प्रश्न माध्यमा्ंनी विचारला. त्यावर बोलत असताना चव्हाण म्हणाले, सर्व निर्णय केंद्रीय स्तरावरील पार्लमेंटरी बोर्डवर होत असतात. मात्र विनोद तावडे यांचे नाव अंतिम झाल्यास आम्हाला खऱ्या अर्थाने आम्हाला आनंद होईल अशी प्रतिक्रिया रवींद्र चव्हाण यांनी दिली.