मुंबई : गिरगावात मराठी भाषेचा द्वेष करत असल्याची घटना घडली आहे. आपली मुंबई सर्वांची आहे. सर्वात आधी मराठी माणसाची आहे. त्यामुळे भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी अशी इच्छा मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केली आहे. गिरगावातील खेतवाडी परिसरात भाषिक द्वेषांची घटना घडली आहे.
मराठी भाषा ही आपल्या महाराष्ट्राची मातृभाषा आहे. आपली अस्मिता आहे. त्यामुळे इथे मराठीत न बोलता एका ठराविक भाषेत बोला अशी सक्ती कोणी करत असेल, तर ते चुकीचे असल्याचे लोढा यांनी म्हटले आहे. भाजपाचे नाव घेऊन असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत असे मंगलप्रभात लोढा यांनी म्हटले आहे. मंगलप्रभात लोढा यांनी या घटनेचा जाहीर निषेध केला आहे.
मंगलप्रभात लोढ यांचे ट्विट
गिरगावातील खेतवाडी परिसरात घडलेल्या भाषिक द्वेष पसरवणाऱ्या घटनेचा निषेध! मराठी भाषा ही आपल्या महाराष्ट्राची मातृभाषा आहे, आपली अस्मिता आहे! त्यामुळे इथे मराठीत न बोलता एका ठराविक भाषेत बोला!, अशी सक्ती कोणी करत असेल, तर ते चुकीचे आहे! भाजपचे नाव घेऊन, अशे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत! आपली मुंबई सर्वांची आहे!, परंतु ती सर्वात आधी मराठी माणसाची आहे, त्यामुळे असा भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी, अशी आमची इच्छा आहे. जाहीर निषेध!
महाराष्ट्रात मराठी भाषेचा द्वेष करणे अत्यंत वाईट आहे. मराठी भाषा ही महाराष्ट्राची आण, बाण आणि शान आहे. अशातच महाराष्ट्रात मराठी न बोलण्यास सांगणाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे. महाराष्ट्रात मराठी भाषेवर आक्षेप घेण्याचा अधिकार कोणालाच नाही कारण मराठी ही महाराष्ट्राची मातृभाषा आहे. गिरगावात मराठीत न बोलता ठराविक भाषेत बोला अशी सक्ती करण्यात आली आहे. याचा लोढा यांनी जाहीर निषेध केला आहे.
काय आहे प्रकरण ?
मुंबई मारवाडी यांची आहे. मुंबई भाजपची... आता भाजप आला आहे. त्यामुळे मराठीत बोलायचं नाही तर मारवाडीत बोलायचं.मलबार हिल मधील एका मारवाडी व्यापाऱ्याची अरेरावीची भाषा. एका मराठी महिलेसोबत अरेरावीची भाषा केल्यानंतर संतापलेल्या महिलेने मनसे कार्यकर्त्यांकडे तक्रार केली. या मनसे कार्यकर्त्यांनी मारवाडी व्यापाऱ्याला मनसे स्टाईल चोप दिला. या महिलेने मंगल प्रभात लोढा यांच्याकडे तक्रार केली मात्र त्यांनीही उडवाउडवीची उत्तर दिली महिलेची माहिती आहे. परंतु लोढा यांनी घटनेची दखल घेत ट्वीट केले आहे.