पुणे : संभाजीराजे छत्रपती यांनी पुण्यात महाराष्ट्र स्वराज्य पक्षाची स्थापना केली. हा पक्ष विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. निवडणूक आयोगाने या पक्षाला मान्यता दिली आहे. सप्तकिरणांसह शाईपेनाची निब हे महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे विधानसभा निवडणुकीसाठीचे निवडणूक चिन्ह आहे.