Sunday, April 13, 2025 08:57:56 PM

डोक्यात सत्तेची हवा गेल्याने पराभव झाला - अण्णा हजारे

डोक्यात सत्तेची हवा गेल्याने पराभव झाला, 'जागरुक मतदार हा आजच्या लोकशाहीचा आधार', 'उमेदवाराकडे स्वच्छ चारित्र्य आणि त्यागाची भावना हवी'अण्णा हजारेंनी केजरीवालसह आप नेत्यांचे टोचले कान

डोक्यात सत्तेची हवा गेल्याने पराभव झाला - अण्णा हजारे

नवी दिल्लीत भाजपने तब्बल 48 जागांवर मुसंडी मारली आहे. तर आम आदमी पक्षाला 22 जागा मिळाल्या आहेत. गेली दोन टर्म सलग सत्ता मिळवणाऱ्या अरविद केजरीवाल यांनी त्यांच्या सरकारचेच मद्यधोरण भोवल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसोवक अण्णा हजारे यांनी दिली आहे.

हेही वाचा:  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट

आप पक्ष अस्तित्वात नव्हता आणि केजरीवाल  जेव्हा माझ्यासोबत आले तेव्हा मी त्यांना सुरुवातीपासून जनतेची सेवा करा असं सांगत होतो. फळाची अपेक्षा न करता केलेले कर्म ही ईश्वराची पूजा असते. अशीच पुजा तुम्ही करत राहा. तुम्हाला कोणी हटवणार नाही. सुरुवातीला बरं वाटलं.नंतर त्यांच्याकडे धन आले, दौलत आली. मग सगळं बिघडलं हे सांगतांना जुन्या आठवणींने अण्णा भावूक होत निःशब्द झाले.

आम आदमी पार्टी ही भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणारा पक्ष म्हणून अस्तित्वात आला. सत्ता मिळाल्यावर ज्या उद्देश्याने पक्षाची निर्मिती झाली होती, त्या उद्देश्याशी फारकत घेत आपच्या काही नेत्यांनी भ्रष्टाचाराचा आसरा घेतला. आप स्वतःला स्वच्छ विचार, स्वच्छ चारित्र्य आणि त्यागाची भावना असणारा पक्ष म्हणून मिरवत होता. मात्र प्रत्यक्षात पक्षाच्या नेत्यांची वागणूक वेगळेच चित्र रंगवू लागल्याने जागरूक मतदारांनी ज्या विश्वासाने दिल्लीची सत्ता दिली होती, त्याच मतदारांनी त्यांच्याकडून सत्ता काढून घेतली. 


सम्बन्धित सामग्री