Wednesday, September 04, 2024 03:46:54 PM

Congress votes split
काँग्रेसची मते फुटली

शुक्रवारी, १२ जुलै रोजी विधान परिषदेच्या ११ जागांसाठी मतदान पार पडलं. याचा निकालही जाहीर झाला. यात काँग्रेसची ७ मते फुटल्याचं दिसत आहे.

काँग्रेसची मते फुटली
congress

शुक्रवारी, १२ जुलै रोजी विधान परिषदेच्या ११ जागांसाठी मतदान पार पडलं. याचा निकालही जाहीर झाला. यात काँग्रेसची ७ मते फुटल्याचं दिसत आहे. 

मतं कशी फुटली ?

काँग्रेसकडे ३७ मतं होती. काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांना २५ मतं मिळाली. सातव यांना २५ मतं देऊन काँग्रेसकडे १२ मतं शिल्लक होती. शिउबाठाकडे १७ मतं होती, काँग्रेसच्या ६ मतांची नार्वेकरांना गरज होती. पण प्रत्यक्षात नार्वेकरांना पहिल्या पसंतीची २२ मतं मिळाली. जयंत पाटलांना फक्त राशपचीच १२ मतं मिळाली, म्हणजेच काँग्रेसची उरलेली सात मतं फुटली. काँग्रेसच्या या मतफुटीचा फायदा अजित पवारांना झाला आहे. अजित पवारांना जास्तीची ७ मते मिळाली आहेत. 

भारतीय जनता पार्टीचे पंकजा मुंडे, डॉ. परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे हे चार उमेदवार विजयी झाले. भाजपाच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सदाभाऊ खोतांचाही विजय झाला. शिवसेनेचे भावना गवळी, कृपाल तुमाने हे दोन उमेदवार जिंकले. राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर हे दोन उमेदवार विजयी झाले. 


सम्बन्धित सामग्री