Tuesday, September 17, 2024 08:57:23 AM

Rahul Gandhi
अमेरिकेत राहुलनं केलं चीनचं कौतुक

राहुल गांधी यांनी रोजगाराच्या मुद्द्यावर चीनचे कौतुक केले आहे.

अमेरिकेत राहुलनं केलं चीनचं कौतुक

डॅलस : लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. टेक्सासमधील (Texas) डॅलस (Dallas) येथे एका कार्यक्रमात ते रोजगाराच्या मुद्द्यावर बोलले. राहुल गांधी यांनी रोजगाराच्या मुद्द्यावर चीनचे कौतुक केले आहे. ते म्हणाले की, भारत आणि पाश्चात्य देशांमध्ये रोजगाराची समस्या आहे पण चीनमध्ये तसे नाही. 

अमेरिका अनेक वर्ष जगाचे निर्मिती केंद्र होते. आता चीन जगाचे निर्मिती केंद्र आहे. अनेक उत्पादनांची निर्मिती चीनमधील कारखान्यांमध्ये होते. यामुळे चीनमध्ये रोजगारांची समस्या नाही. रोजगाराचा प्रश्न दक्षिण कोरिया, जपान, व्हिएतनाम या देशांमध्येही नाही. भारतात जास्त औद्योगिक उत्पादन होत नाही. यामुळे देशात रोजगाराची समस्या आहे. लोकशाही व्यवस्थेत रोजगारांसाठी औद्योगिक उत्पादनांची निर्मिती कशी करावी याचा विचार भारताला करावा लागेल, असे राहुल म्हणाले. बांगलादेशमधील वस्त्रोद्योगाचे राहुल यांनी कौतुक केले. बांगलादेशमधील वस्त्रोद्योगासमोर भारतीय वस्त्रोद्योगाचा टिकाव लागला नाही, असेही राहुल म्हणाले. 

देवता म्हणजे काय ?

राहुल गांधी यांनी डॅलस येथील कार्यक्रमात बोलताना देवता या शब्दाची व्याख्या सांगितली. 'जो जसं बोलतो तसाच वागतो. जे मनात तेच कृतीत आणतो त्याला देवता म्हणतात', असं राहुल म्हणाले.

'राहुल पप्पू नाही विद्वान'

राहुल पप्पू नाही विद्वान आहेत. धोरणी आहेत. या शब्दात सॅम पित्रोदा यांनी राहुल गांधींचे कौतुक केले.

'भारत हा अनेक विचारांचा देश'

राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी भारत ही एक कल्पना आहे. तर काँग्रेससाठी भारत हा अनेक विचारांचा देश आहे; असं राहुल गांधी म्हणाले.

                 

सम्बन्धित सामग्री