सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये शिवरायांचा पुतळा पडल्याप्रकरणी शिउबाठाच्या आदित्य ठाकरे आणि भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडून घटनेची पाहणी करण्यात आली. यावेळी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आले आणि त्यांच्यामध्ये हाणामारी झाली. दोन्ही पक्षांमधील मारामारी सोडवण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप केली. या राड्यात काही पोलिस जखमी झाले.
घटनाक्रम :
शिवरायांचा पुतळा पडल्यानंतर नेतेमंडळी राजकोट किल्ल्यावर
खासदार नारायण राणे, निलेश राणे राजकोट किल्ल्यावर पोहोचले
विजय वडेट्टीवार राजकोट किल्ल्यावर पोहोचले
राजकोट किल्ल्यावर राणे - वडेट्टीवारांमध्ये हस्तांदोलन
आदित्यही राजकोट किल्ल्यावर पोहोचले
राणे समर्थकांकडून आदित्यसमोर घोषणाबाजी
मालवणमध्ये तणावाचं वातावरण
मालवणमध्ये ठाकरे - राणे कार्यकर्ते आमनेसामने
आदित्यला बघताच राणे समर्थक पेटले
किल्ल्यावर दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी
राड्यात पोलीस जखमी
आदित्य दोन तासांनंतर किल्ल्याबाहेर पडले