१२ जुलै, २०२४ मुंबई : शुक्रवारी, १२ जुलै रोजी विधान परिषदेच्या ११ जागांसाठी मतदान पार पडलं. याचा निकालही जाहीर झाला.
विधान परिषदेच्या निकालाची वैशिष्टये काय आहेत ?
काँग्रेसची सात मतं फुटल्याची चर्चा
महायुतीचे नायक देवेंद्र फडणवीसच
दोन वर्षानंतर पुन्हा एकदा फडणवीसांचा राजकीय वरचष्मा
शरद पवारांना अजित पवारांचं एकही मत फोडता आलं नाही
उद्धव ठाकरेंना शिंदेंचं एकही मत फोडता आलं नाही.
भाजपाचे तरूण चेहरे विधान परिषदेत दिसणार.
पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन, पाच वर्षांनंतर आमदार
अमित गोरखेंच्या स्वरूपात विधान परिषदेत मातंग चेहरा
योगेश टिळेकर यांच्या माध्यमातून माळी समाजाला नेतृत्व
भारतीय जनता पार्टीचे पंकजा मुंडे, डॉ. परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे हे चार उमेदवार विजयी झाले. भाजपाच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सदाभाऊ खोतांचाही विजय झाला. शिवसेनेचे भावना गवळी, कृपाल तुमाने हे दोन उमेदवार जिंकले. राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर हे दोन उमेदवार विजयी झाले.
महाविकास आघाडीच्या तीन पैकी दोन उमेदवारांचा विजय झाला. काँग्रेसच्या प्रज्ञा सातव आणि शिउबाठाचे मिलिंद नार्वेकर जिंकले आहेत. राशपच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवणाऱ्या शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव झाला आहे. शरद पवार पाठिशी असूनही जयंत पाटलांचा पराभव झाला आहे.