Wednesday, May 28, 2025 02:35:01 PM

भाजप नेत्यांना फोन यायला सुरुवात: कुणाकुणाला फोन, कुणाचा पत्ता कट?

भाजप नेत्यांना फोन यायला सुरुवात मंगल प्रभात लोढा यांना चंद्रशेखर बावनकुळे यांचा फोन नितेश राणे यांना चंद्रशेखर बावनकुळे यांचा फोन

भाजप नेत्यांना फोन यायला सुरुवात कुणाकुणाला फोन कुणाचा पत्ता कट

 
मुंबई : महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्ताराची वेळ जवळ आली आहे. नागपूरमध्ये आज संध्याकाळी होणाऱ्या शपथविधीसाठी सरकार तयार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा बदल होण्याची शक्यता आहे. प्रत्येक मंत्रिमंडळ विस्तारामध्ये काही जुन्या चेहरे बाहेर पडतात आणि काही नवे चेहरे दाखल होतात, तसेच यावेळीही हेच घडणार आहे.मंत्रिमंडळ विस्ताराच्या शपथविधीसाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने तयारी केली आहे. शपथविधीला काही तास बाकी असताना, मंत्रीपद मिळवण्यासाठी रात्रभर लॉबिंग आणि चर्चा सुरू होत्या. काही नेत्यांनी फोन करून आपला दावा प्रस्तुत केला आहे, तर काहींचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे.

शिवसेनेतून 12 मंत्र्यांची नावे निश्चित

सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेनेच्या 12 मंत्र्यांची नावे अंतिम झाल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये काही जुन्या चेहरे कायम ठेवले गेले आहेत, तर काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. शिवसेनेच्या काही नेत्यांना मंत्रीपदाची लॉटरी लागली आहे. शिवसेनेच्या अनेक आमदारांना मंत्रिमंडळ विस्ताराच्या आधी रात्रभर लॉबिंग करावं लागलं आहे.

भाजपला पाठिंबा, काही आमदारांची लॉटरी

नवीन मंत्रिमंडळात भाजपच्या काही आमदारांचा समावेश असण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्या काही आमदारांना फोन केले असून, त्यांना मंत्रिपद मिळवण्यासाठी तयारी करण्यासाठी सूचना दिल्या आहेत. नितेश राणे, शिवेंद्रराजे आणि मंगलप्रभात लोढा यांना फोन गेल्याची माहिती मिळाली आहे.

राष्ट्रवादी पक्ष अजित पवार 

मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळी उपमुख्यमंत्री  अजित पवार चर्चेत आहेत.  सूत्रांच्या मते, अजित पवार राष्ट्रवादी पक्षातून चार आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. आदिती तटकरे, अनिल पाटील, हसन मुश्रीफ आणि नरहरी झिरवाळ यांना मंत्रिपदासाठी फोन गेले आहेत. यामुळे अजित पवार गटाच्या सदस्यांमध्ये आनंदाचा माहौल आहे, कारण त्यांना पुन्हा राज्य सरकारमध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे.


हिवाळी अधिवेशनाच्या पाश्र्वभूमीवर, नागपूरतील शपथविधीला उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. आता कुणाला लॉटरी लागणार आणि कुणाचा पत्ता कट होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 


सम्बन्धित सामग्री