Thursday, June 27, 2024 08:31:01 PM

Mumbai North West Loksabha Result
वायव्य मुंबईतील निकालाविरोधात न्यायालयात जाणार

वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील निकालाविरोधात न्यायालयात दाद मागणार, असे शिउबाठाचे आदित्य ठाकरे आणि अनिल परब म्हणाले.

वायव्य मुंबईतील निकालाविरोधात न्यायालयात जाणार

मुंबई : वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील निकालाविरोधात न्यायालयात दाद मागणार, असे शिउबाठाचे आदित्य ठाकरे आणि अनिल परब म्हणाले. शिवसेनेचे रविंद्र वायकर आणि शिउबाठाचे अमोल किर्तिकर यांच्यात वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघात थेट लढत झाली. या लढतीत वायकरांचा ४८ मतांनी विजय झाला. या निकालाविरोधात शिउबाठा न्यायालयात दाद मागणार आहे. मतमोजणीच्या दिवशी १९ व्या फेरीपासून गडबड सुरू झाली. प्रत्येक फेरीत कोणाला किती मते पडली हे सांगणे बंधनकारक आहे. पण १९ व्या फेरीपासून कोणाला किती मते पडली हे सांगणे बंद झाले. वेळेचे कारण देण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी आणि आमच्या मतांत जवळपास ६५० मतांचा फरक येत आहे. या सगळ्याविरोधात आम्ही न्यायालयात जाणार असून विधानसभा निवडणुकीच्या आधी विहित काळात न्याय मिळावा अशी आमची मागणी असेल, असे अनिल परब म्हणाले. मतमोजणी सुरू असताना निवडणूक निर्णय अधिकारी वारंवार खुर्ची सोडून लांब जाऊन फोनवर बोलत होते. याच कारणामुळे आम्ही दिवसभराच्या सीसीटीव्ही फूटेजची मागणी केली आहे; असेही अनिल परब म्हणाले.


सम्बन्धित सामग्री