Sunday, March 16, 2025 07:11:13 PM

अजित पवारांनी मतदारांना सुनावले खडे बोल

अजित पवारांचा पारा चढला

अजित पवारांनी मतदारांना सुनावले खडे बोल

 

बारामती : अजित पवार हे त्यांचा विधानांसाठी नेहमीच चर्चेत असतात. कधी ही विधाने मार्मिक असतात तर कधी ही विधाने तिखट असतात. अजित पवार त्यांच्या विधानांमुळे अनेकदा अडचणीतदेखील आले आहेत. पण अजित पवारांनी मात्र आपली शैली कधी सोडली नाही.

अजित पवार सध्या बारामती दौऱ्यावर आहेत. अजित पवार बारामतीतील विकास कामांची पाहणी करत आहेत. बारामतीत जनतेशी पवार सवांद देखील साधताना टिपले जात आहेत. रविवारी पवार यांनी  विविध विकास कामांच्या उद्घाटन सोहळ्यात हजेरी लावली होती. बारामती येथील मेडद या ठिकाणी एका पेट्रोल पंपचा उद्घाटन सोहळा होता. 
त्यातच एका कार्यकर्त्याने आपली कामं नाही झाली असे सांगितले. या गोष्टीवरून अजित पवारांचा पारा चढला आणि पवार म्हणाले, मतं दिली म्हणजे म्हणजे माझे मालक झाला नाहीत' मला सालगडी केलंत का?. अजित पवारांना त्या कार्यकर्त्यांचं वागणं जास्त काही भावलं नाही. पण अजित पवारांच्या या विधान वाऱ्यासारखे पसरले. 
अजित पवार बारामती दौऱ्यावर असताना क्रिकेटदेखील खेळले, त्यांनी गोलंदाजीचा करण्याचा आनंद लुटला. 


सम्बन्धित सामग्री