महाराष्ट्र: राज्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसलीच पाहायला मिळतंय. गेल्या दोन आठवड्यात ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. यामुळे ठाकरे गटाची डोकेदुखी चांगलीच वाढलीय. त्यातच आता विरोधी पक्षनेता आदित्य ठाकरे होणार का? अशा चर्चा सर्वत्र रंगू लागल्यात. याच पार्शवभूमीवर ठाकरे गटाने मातोश्रीवर आपल्या आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत ऑपरेशन टायगर रोखण्यासह राज्याच्या विरोधी पक्ष नेतेपदाबाबत चर्चा झाली असल्याची माहिती समोर आलीय.
विरोधी पक्षनेता म्हणून कोणाचं नाव चर्चेत?
विरोधी बाकांवर शिवसेना ठाकरे गटाचे संख्याबळ अधिक आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाकडून विरोधी पक्षनेते पदासाठी दावा केला जाण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते भास्कर जाधव हे विरोधी पक्षनेते पदासाठी उत्सुक असल्याचं बोललं जातंय. ठाकरेंच्या शिवसेनेकडून विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधव,आदित्य ठाकरे,आणि सुनील प्रभू यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. विधानसभा विरोधी पक्षनेता बाबत विधानसभा अध्यक्ष सकारात्मक असल्यास ठाकरेंच्या शिवसेनेकडून विरोधी पक्ष नेत्या संदर्भात नाव या अधिवेशनात दिले जाणार आहे.
दरम्यान विरोधी पक्ष नेत्याच्या नावावर या बैठकीत चर्चा करण्यात आली आल्याची माहिती समोर आली असून आता विरोधी पक्षनेतेपदी कोणाची वर्णी लागणार हे पाहणं महत्वाचं ठरणारे.