Sunday, March 16, 2025 07:10:44 PM

Delhi Election Results 2025: आपच्या माजी मुख्यमंत्री आतिषी विजयी

दिल्लीतील आपच्या माजी मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांचा विजय झाला आहे.

delhi election results 2025 आपच्या माजी मुख्यमंत्री आतिषी विजयी

दिल्ली : दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळपासून सुरूवात झाली. दिल्लीतील आपच्या माजी मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांचा विजय झाला आहे. आतिशी यांनी  कालकाजी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. 
दिल्लीतील कालकाजी मतदारसंघातून आम आदमी पार्टीच्या आतिशी मार्लेना विजयी झाल्या आहेत. भाजपाच्या रमेश बिधुडी यांचा पराभव झाला आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेसच्या अल्का लांबा होत्या. कालकाजी मतदारसंघात भाजपा आणि आप यांची चुरस पाहायला मिळाली. परंतु भाजपाला या मतदारसंघात स्वत: गड राखता आला नाही. आम आदमी पार्टीने कालकाजी बाजी मारून गड राखला आहे. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांचा विजय झाला आहे. 

हेही वाचा : Delhi Election Results 2025: दिल्लीत भाजपाची मुसंडी

भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर सगळी सूत्र आतिशी यांच्याकडे गेली. केजरीवालांनंतर आतिशी या दिल्लीच्या मुख्यमंत्री झाल्या. 2020 मध्ये आतिशी यांनी पहिल्यांदा निवडणुक लढवली होती. त्यावेळी 11 हजारांपेक्षा अधिक मतांनी त्यांचा विजय झाला होता. 2020मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत आतिशी यांना 11 हजार 393 मते मिळाली होती. 

दिल्लीतील विधानसभा निवडणुकीत आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना पराभवाचा सामना करावा लागला. तर दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनादेखील पराभव पत्कारावा लागला आहे. मात्र आपच्या प्रमुख नेत्यांमधील आतिशी मार्लेना यांचा विजय झाला आहे. त्यामुळे आपला काहीसा दिलासा मिळाला आहे.  


सम्बन्धित सामग्री