पुणे लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी भाजपा आणि मनसेचे दिग्गज नेते प्रचाराच्या रिंगणात उतरले आहेत. शुक्रवारी आणि शनिवारी राज ठाकरे आणि नितीन गडकरी पुण्यात सभा घेणार आहेत.
महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी मनसे नेता राज ठाकरे शुक्रवारी, १० मे रोजी पुण्यात सभा घेणार आहेत. पुण्यातील सारसबागेच्या चौकामध्ये राज ठाकरेंची सायंकाळी ६ वाजता जाहीर सभा होणार आहे. तर, शनिवारी मुरलीधर मोहोळ यांच्या सांगता सभेसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. शनिवारी, ११ मे रोजी सकाळी १० वाजता पुण्यातील नातूबाग येथे नितीन गडकरी यांची सभा होणार आहे.
पुणे, मावळ, शिरूर या मतदारसंघासाठी १३ मे, २०२४ रोजी चौथ्या टप्प्यात निवडणूका पार पडणार आहेत. चौथ्या टप्प्यातील निवडणुकांच्या प्रचारासाठी उरले अवघे काही तास उरले आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात सभांचा धडाका सुरु आहे.
https://www.youtube.com/watch?v=SDCTSVK2bqU&feature=youtu.be