Sunday, June 30, 2024 09:17:36 AM

खटल्यात विसंगती का ?

खटल्यात विसंगती का

पुणे, ९ मे २०२४, प्रतिनिधी : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली आहे. जिल्हा व सत्र न्यायालयात यावर सुनावणी सुरू होती. ती आता पूर्ण झाल्याने शुक्रवारी (दि. १०) या प्रकरणी निकाल लागणार असून, आरोपींना काय शिक्षा होणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. काय हे संपूर्ण प्रकरण आहे पाहुयात…

https://www.youtube.com/watch?v=E-Epjr_EWDk

डॉ. दाभोलकर मॉर्निंग वॉकला गेले असताना २० ऑगस्ट २०१३ रोजी त्यांचा गोळ्या झाडून खून करण्यात आला. या घटनेने अवघे राज्य हादरले. दाभोलकरांच्या खुनानंतर तब्बल आठ वर्षांनी हा खून खटला सुरू होण्यास मुहूर्त लागला. खुनाचा तपास पूर्ण होऊन पुण्यातील विशेष न्यायालयाने ५ आरोपींविरोधात आरोप निश्चित केले आणि खटल्यास सुरुवात झाली. जवळपास अडीच वर्षांपासून हा खटला चालू होता. खटला सुरु व्हायला ८ वर्षे लागली पण अडीच वर्षातच निकाल आला आहे…

दाभोलकर हत्याप्रकरणी शुक्रवारी निर्णय
दहा वर्षांनंतर दाभोलकर हत्याप्रकरणी निकाल
खटला सुरु व्हायला आठ वर्षे, निकाल दोन वर्षात
दाभोलकर हत्येच्या खटल्यात अनेक विसंगती

...........

दाभोलकर हत्या खटल्यातील विसंगती

दिनांक २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्याच्या ओंकारेश्वर पुलावर सकाळी ७ वाजून २० मिनिटांच्या सुमारास २ अज्ञात व्यक्तींनी पाठीमागून येऊन गोळ्या घालून नरेंद्र दाभोलकर यांची हत्या केली आणि पळत येऊन पोलीस चौकीसमोर उभ्या बाईकवर बसून कथित हल्लेखोर पसार झाले. या घटनेचे सहा साक्षीदार आहेत. खटला सुरू व्हायला ८ वर्षे लागली पण अडीच वर्षातच निकाल अपेक्षित आहे… मात्र या खटल्यातील विविध विसंगती समोर आल्या आहेत. या विसंगती काय आहेत ते पाहुयात…

https://www.youtube.com/watch?v=R3TXdZJNnQw

खटल्यातील विसंगती

संजय साडविलकर याने डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याच्याविरोधात साक्ष दिली.
संजय साडविलकर याचे हिंदू जनजागृती समितीशी वैर होते.

विकास खंडेलवाल आणि मनीष नागोरी यांना अटक केली आणि पुणे पोलिसांनी सोडून दिले
सीबीआयने विकास खंडेलवाल आणि मनीष नागोरीबाबत स्पष्टीकरण न देताच क्लीनचिट दिली.

सारंग अकोलकर आणि विनय पवार हे मारेकरी - सीबीआय
सचिन अंदुरे आणि शरद कळसकर हे मारेकरी - साक्षीदार

साक्षीदार २०१६ मध्ये म्हणाले सारंग अकोलकर आणि विनय पवार हे मारेकरी
साक्षिदार २०१८ मध्ये म्हणाले सचिन अंदुरे आणि शरद कळसकर हे मारेकरी

ऍड. संजीव पुनाळेकर यांनी शरद कळसकर याला वापरलेले पिस्तूल फेकून देण्याचा सल्ला दिला - सीबीआय
साक्षीदाराला न्यायालयासमोर आणले नाही. पुराव्या अभावी ऍड. पुनाळेकर जामिनावर मुक्त

विक्रम भावे याने गुन्ह्यात वापरलेले वाहन उभे करायला जागा दाखवली - सीबीआय
न्यायालयासमोर सीबीआयने पुरावा न दिल्याने विक्रम भावे जामिनावर मुक्त

अंधश्रद्धांच्या विरोधात काम करायचे थांबवा. नाही तर तुमचा दुसरा गांधी करू अशा धमक्या वडिलांना मिळाल्या - हमीद दाभोलकर
न्यायालयात दावा सिद्ध करण्यासाठी हमीदने पुरावेच दिले नाहीत.

'सनातन'कडून येणाऱ्या धमक्यांसंदर्भात सीबीआयला पत्रे लिहिली आणि कागदपत्रे दिली - हमीद
हमीदने कोणतेही पत्र आम्हाला दिलेले नाही - सीबीआय

सीबीआयने पुणे मनपाच्या किरण कांबळे या सफाई कर्मचाऱ्याला साक्षीदार केले.
किरण कांबळेने २०१३च्या घटनेतील आरोपी २०१८ मध्ये ओळखले. दाभोलकरांना जाहमी अवस्थेत बघूनही किरण चहा प्यायला निघून गेला. स्वतःला स्मृतिभ्रंश झाल्याचे मान्य केले.

विनय केळकर हा हत्येचा साक्षीदार बनला.
विनय केळकरने हत्येचे वर्णन तीन प्रकारे केले. चारपैकी दोघांना मारेकरी ठरवले. मात्र, त्यातही विसंगती आढळली.

साक्षीदार कांबळे आणि केळकर म्हणतात की, त्यांनी गोळ्या झाडल्याचे आवाज ऐकले.
घटनास्थळाजवळ नाकाबंदीसाठी तैनात पोलीस उपनिरीक्षक रानगट म्हणाले की, 'असा काही आवाज ऐकू आला नाही'.

सचिन अंदुरे आणि शरद कळसकर हे मारेकरी - साक्षीदार
सीबीआयने सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांची ओळखपरेड घेतलीच नाही.

पिस्तुलाने नरेंद्र दाभोलकरांची हत्या झाली - सीबीआय
ऑगस्ट २०१३ दाभोलकरांच्या हत्येसाठी मध्ये वापरलेले पिस्तूल सीबीआयच्या ताब्यात असताना त्याच पिस्तुलाने फेब्रुवारी २०१५मध्ये पानसरे यांची हत्या झाल्याचा दावा करण्यात आलाय.

घटनास्थळी दोन जिवंत काडतुसे सापडली -
जिवंत काडतुसांबाबत कसलेही स्पष्टीकरण सीबीआयने न्यायालयात दिलेले नाही. सापडलेल्या काडतुसांवर हाताच्या बोटांचे ठसेही नव्हते.

मारेकऱ्यांनी दाभोलकरांवर पाठीमागून दोन गोळ्या झाडल्या - सीबीआय
प्रत्यक्षात दाभोलकरांना पाठीमागून दोन गोळ्या तर, समोरून एक गोळी लागल्याचे अहवाल सांगतो.

दाभोलकरांच्या उजव्या भुवईत घुसून डोक्याच्या मागील बाजूने गोळी बाहेर पडली - अहवाल
दाभोलकरांवर चाललेली तिसरी गोळी आणि त्याचे काडतूस घटनास्थळी मिळालेले नाही.

घटनास्थळाची श्वान पथकाकडून तपासणी - पुणे पोलीस
श्वानपथक दाभोलकरांच्या निवासस्थानाच्या दिशेने न जाता विरुद्ध दिशेने गेले.

गोळी झाडल्याने दाभोलकर जमिनीवर कोसळले असा दावा.
दाभोलकरांच्या कपाळाच्या डाव्या बाजूस आणि पॅन्ट न फाटता उजव्या गुडघ्यास खरचटले कसे?

हत्येच्या आदल्या रात्री नरेंद्र दाभोलकर कुठे होते ?


सम्बन्धित सामग्री