Sunday, June 30, 2024 09:31:14 AM

कोण महा गद्दार?

कोण महा गद्दार

मुंबई, ९ मे २०२४, प्रतिनिधी : राज्यातील राजकारणाची पातळी घसरल्याची टीका सातत्याने होत असते. लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने पुन्हा एकदा राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून एकमेकांवर वैयक्तिक टीका टिप्पणी करण्यात येत आहे. त्यातच, शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला असून महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यात ह्या जागांवर मतदान होत आहे. तत्पूर्वीच ठाणे, कल्याण आणि मुंबईतील निवडणूक प्रचारातील प्रचारात व्यक्तीगत टीकास्त्र सोडले जात आहे. शिवसेना प्रवक्त्या आणि राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका करताना दिवार चित्रपटातील अमिताभ बच्चन यांच्या डायलॉगशी साधर्म्य जोडून हल्लाबोल केला. या टीकेनंतर राजकीय वर्तुळात वाक्युद्धा सुरु झाले कसे शब्दबाण या निमित्ताने सुटले तेच पाहणार आहोत

https://youtu.be/MWyqOXe0XO8

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे महाराष्ट्रातलं विशेषत: मुंबईतलं राजकारण चांगलंच तापलं आहे. महाविकास आघाडीचे उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघाचे उमेदवार संजय दीना पाटील यांच्या प्रचारसभेत प्रियंका चतुर्वेदी यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली. दुसरीकडे काँग्रेसमधून शिवसेनेत सहभागी झालेले नेते संजय निरुपम यांनीदेखील प्रियंका चतुर्वेदी यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.


सम्बन्धित सामग्री