Sunday, June 30, 2024 09:03:03 AM

मुसलमान झपाट्याने वाढतायेत

मुसलमान झपाट्याने वाढतायेत

नवी दिल्ली, ९ मे २०२४, प्रतिनिधी : भारतामध्ये स्वातंत्र्योत्तर काळात हिंदूंची लोकसंख्या घटल्याची आणि मु्स्लिमांची संख्या लक्षणीयरीत्या वाढल्याची आकडेवारी एका अहवालातून समोर आली आहे. या अहवालानुसार १९५० ते २०१५ या काळात भारतातीलहिंदूंची संख्या ७.८ टक्क्यांनी घटल्याचे तर मुस्लिमांची लोकसंख्या ४३ टक्क्यांनी वाढल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे. हा अहवाल प्रसिद्ध होताच भाजपा आणि काँग्रेसने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यास सुरुवात केली आहे. काय आहे अहवालात आणि कुठला हा अहवाल आहे आणि या अहवालनानंतर काय राजकीय युद्ध सुरु झालंय पाहुयात…

https://youtu.be/l-uKASRBdhk

पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने हा अहवाल तयार केला आहे. या अहवालानुसार भारतातील हिंदूंच्या लोकसंख्येमध्ये १९५० ते २०१५ या काळात ७.८ टक्क्यांनी घट झाली आहे. याउलट भारताच्या शेजारील देशांमध्ये बहुसंख्याक समाजाच्या लोकसंख्येत वेगाने वाढ होत असल्याचं चित्र दिसत आहे. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने आपल्या अहवालामध्ये जगभरातील १६७ देशांमधील परिस्थितीचा अभ्यास करून माहिती देण्यात आली आहे. मे २०२४ मध्ये हा अहवाल सादर करण्यात आला आहे. या अहवालानुसार भारतात बहुसंख्याक हिंदूंची लोकसंख्येमधील हिस्सेदारी कमी झाली आहे. दुसरीकडे मुस्लिम, ख्रिश्चन, बुद्ध आणि शीखांची इतर अल्पसंख्याकांची लोकसंख्येमधील भागिदारी वाढली आहे. मात्र जैन, पारशी धर्मांच्या लोकसंख्येत घट झाली आहे. १९५० ते २०१५ या काळात भारतामध्ये मुस्लिम लोकसंख्या ४३.१५ टक्क्यांनी वाढली आहे. तर ख्रिश्चनांच्या लोकसंख्येत ५.३८ टक्के शिखांच्या संख्येत ६.५८ टक्के आणि बुद्धांच्या संख्येत किरकोळ वाढ दिसून आली.

पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचा अहवाल
भारतातील हिंदूंच्या संख्येत ७.८१ टक्क्यांची घट
देशातील मुसलमानांच्या संख्येत ४३.१५ टक्क्यांची वाढ
लोकसंख्येतील हिंदूंचे प्रमाण ७.८१ टक्क्यांची घट झाल्यानंतर ७८.०६ टक्के
लोकसंख्येतील मुसलमानांचे प्रमाण ४३.१५ टक्क्यांच्या वाढीनंतर १४.०९ टक्के
लोकसंख्येतील ख्रिश्चनांचे प्रमाण २.३६ टक्क्यांच्या वाढीनंतर ५.४ टक्के


सम्बन्धित सामग्री