Tuesday, April 01, 2025 01:42:07 AM

मनीषा कायंदेंचा चतुर्वेदींवर रोखठोक सवाल

मनीषा कायंदेंचा चतुर्वेदींवर रोखठोक सवाल  

मुंबई, ९ मे २०२४, प्रतिनिधी : काँग्रेस खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदेंवर टीका केली त्यावर शिवसेना आमदार मनीषा कायंदेंनी चतुर्वेदींच्या टीकेला उत्तर दिले आहे.

अनेक वर्षांपासून उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून प्रियांका चतुर्वेदी निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. चतुर्वेदी यांना लोकसभेत निवडून जायचे आहे. मात्र देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट असल्याने आपण निवडून येणार नाहीत. म्हणून त्या वैफल्यग्रस्त झाल्याने अशी वक्तव्ये करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.काँग्रेसचीच लोक बोलतात की चतुर्वेदी संध्याकाळी भेटत नाहीत. त्या ८ नंतर उपलब्ध नसतात. याउलट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे २४ तास लोकांसाठी उपलब्ध असतात. डॉ. श्रीकांत शिंदेदेखील २४ तास लोकांसाठी उपलब्ध असतात. मग चतुर्वेदी का उपलब्ध नसतात ? असा सवालही त्यांनी चतुर्वेदींना केला आहे.

पुढे कायंदे म्हणाल्या,  चतुर्वेदींना खासदारकी लढायची आहे. तर आपल्याबद्दल लोक काय बोलतात याचा त्यांनी विचार करायला हवा. त्यांच्याबद्दलचे रिपोर्ट्स काय सांगतात याचे उत्तर प्रियांका चतुर्वेदी यांनी द्यावे असा प्रश्न कायंदेंनी उपस्थित केला आहे.


सम्बन्धित सामग्री