Tuesday, June 25, 2024 12:00:39 PM

शीतल महात्रेंची चतुर्वेदींवर आगपाखड

शीतल महात्रेंची चतुर्वेदींवर आगपाखड

मुंबई, ९ मे २०२४, प्रतिनिधी : शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी काँग्रेस खासदार प्रियांका चतुर्वेदी यांना खासदारकी कशी मिळवली, हे लोकांना सांगितले पाहिजे म्हणत त्यांच्यावर हल्लाबोल केला. मराठीचा गंध नसताना, कुठलेही कर्तृत्व नसताना, इतकेच काही शिवसेनेशी संबंध नसताना चतुर्वेदी तुम्ही खासदारकी मिळवली. आता खासदारकीची टर्म संपत असताना चतुर्वेदींची तडफड सुरु आहे आणि ती त्यांच्या वक्तव्यातून दिसते असे म्हात्रे म्हणाल्या आहेत.

चतुर्वेदींवर बोलताना म्हात्रेंना बुलंदी सिनेमातला एक डायलॉग आठवला. ‘बिल्ली के दात गिरे नहीं और चली शेर के मुँह में हाथ डालने’ अशीच काहीशी परिस्थिती प्रियंका चतुर्वेदी यांची झाली आहे असे म्हणत शीतल म्हात्रेंनी त्यांच्यावर घणाघात केला.

पुढे म्हात्रे म्हणाल्या, तुमचा काही संबध नसताना दावोसला जाऊन गुलाबी थंडीत काय केले हेही प्रियंका चतुर्वेदींनी लोकांना सांगितले पाहिजे. पुन्हा खासदारकी मिळवण्यासाठी गेल्या आठड्यात कोणाकोणाला भेटलात आणि स्वत:जवळ आदित्य ठाकरेंचे कसे कसे फोटोग्राफ आहेत हे दाखवून तरी मला खासदारकी द्या, असे सांगणाऱ्या प्रियंका चतुर्वेदी यांनी बोलताना विचार करावा आणि भान ठेवावे असे म्हणत त्यांनी चतुर्वेदींवर आगपाखड केली.


सम्बन्धित सामग्री