Sunday, June 30, 2024 08:48:35 AM

शरद पवार पुन्हा ऍक्टिव्ह मोडवर

शरद पवार पुन्हा ऍक्टिव्ह मोडवर

पुणे, ८ मे २०२४, प्रतिनिधी : बारामती लोकसभा निवडणूक नुकतीच पार पडली आहे. बारामतीची रणधुमाळी संपताच शरद पवार पुन्हा ऍक्टिव्ह मोडवर आहेत. बुधवारी पवार अमोल कोल्हे यांच्यासाठी सभा घेणार आहेत. तत्पूर्वी शरद पवारांनी बारामती लोकसभेचा आढावा घेतला. प्रत्येक तालुक्याच्या प्रमुखाकडून माहिती घेतली. किती तालुक्यात, किती मतदान झालं, बुथ यंत्रणा कशी होती याचा आढावा घेतला. त्यावर कार्यकर्त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती प्रमुखांनी दिली. सुप्रिया ताई विजयी होतील असा विश्वास पवारांसमोर व्यक्त केला.  


सम्बन्धित सामग्री