Sunday, June 30, 2024 08:37:37 AM

मोदींच्या सभेसाठी महायुतीची महत्त्वपूर्ण बैठक

मोदींच्या सभेसाठी महायुतीची महत्त्वपूर्ण बैठक

मुंबई, ८ मे २०२४, प्रतिनिधी : महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बुधवारी मुंबई येथे बैठक होणार आहे. एमसीए क्लबमध्ये संध्याकाळी ९ वाजता या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला आशिष शेलार, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, उदय सामंत, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आदी उपस्थित राहणार आहेत. १५ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुंबई येथे पहिली सभा होणार आहे. त्यानंतर १७ मे रोजी रोड शो होणार आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीची ही बैठक महत्त्वपूर्ण असणार आहे. या बैठकीत मोदींची सभा आणि रोड शो चे नियोजन केले जाणार आहे.  

                    

सम्बन्धित सामग्री