Sunday, June 30, 2024 09:16:28 AM

महायुतीच्या उमेदवारांसाठी राज ठाकरेंच्या सभांचा धडाका

महायुतीच्या उमेदवारांसाठी राज ठाकरेंच्या सभांचा धडाका

पुणे, ८ मे २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांचा धडाका सुरू झाला आहे. पुण्यात शुक्रवारी १० मे रोजी मुरलीधर मोहोळ यांचा प्रचारात सारसबाग चौक येथे राज ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे. १२ मे रोजी कल्याण आणि ठाणे येथे राज ठाकरे यांच्या जाहीर सभेचे आयोजन केले आहे. १३ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत राज ठाकरे यांची मुंबईला शिवाजी पार्क येथे सभा होणार आहे. सध्या महायुतीसाठी राज ठाकरे यांच्या सभांचा धडाका सुरू आहे.


सम्बन्धित सामग्री