Sunday, July 07, 2024 12:39:34 AM

मतदानाच्या दिवशी कसे असेल हवामान ?

मतदानाच्या दिवशी कसे असेल हवामान

मुंबई, ६ मे २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान मंगळवार ७ मे २०२४ रोजी होणार आहे. या टप्प्यात महाराष्ट्रातील ११ जागांवर मतदान होणार आहे. राज्यात कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मतदान होणार आहे. उन्हाळा सुरू आहे. यामुळे मतदानाच्या दिवशी राज्यात कसे हवामान असेल असा प्रश्न मतदारांना आणि उमेदवारांना सतावत आहे. या पार्श्वभूमीवर वेधशाळेने मंगळवार ७ मे साठीचा हवामानाचा अंदाज जाहीर केला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार ७ मे रोजी मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. नांदेड आणि लातूर येथे तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटाची तसेच ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.


सम्बन्धित सामग्री