Sunday, October 06, 2024 02:24:23 AM

महायुतीच्या सर्व पक्षांच्या प्रचाराची झंझावात धुरा देवेंद्र फडणवीसांवर

महायुतीच्या सर्व पक्षांच्या प्रचाराची झंझावात धुरा देवेंद्र फडणवीसांवर

मुंबई, ०३ मे २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना महायुतीला विविध अडचणींचा सामना करावा लागला. यावेळी महायुतीत अजित पवार यांच्या वेगळ्या विचारधारेच्या पक्षाचा समावेश झाला. त्यामुळे जागावाटप करताना आलेल्या अडचणींवर मात कसे करायचं हे फडणवीसांना चांगलं माहिती आहे. अशातच असंख्य बैठका, दिल्ली वाऱ्या, नाराजांची नाराजी दूर करण्यासोबत उमेदवारांसाठी सभा घेणे, या सर्व जबाबदाऱ्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकहाती पार पाडल्या आहेत.

महायुतीत शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) यांच्यासह महादेव जानकर, सदाभाऊ खोत सहभागी झाल्यामुळे महायुतीचे बळ अधिक प्रमाणात वाढले. मात्र, लोकसभेच्या निवडणुका लागल्यानंतर जागावाटपाचे खरे आव्हान होते. मुंबई, नाशिक, ठाणे, कल्याण, पालघर, छत्रपती संभाजीनगर, यवतमाळसह अनेक मतदारसंघांवर तिन्ही पक्षांनी दावे केल्यामुळे जागावाटपाचा तिढा वाढला होता. काही जागांवर माघार घेऊन, तर विजयाचे समीकरण जुळविण्यासाठी काही ठिकाणचे उमेदवार बदलण्यास भाग पाडून देवेंद्र फडणवीस यांनी हा तिढा यशस्वीपणे सोडवला. त्यामध्ये काही जागा सोडल्यामुळे स्वपक्षाची नाराजीही त्यांना झेलावी लागली. आणि ती नाराजी दूरही करण्यात यशस्वी झालेत असेही म्हणता येईल. एकीकडे जागावाटप सुरू असताना दुसरीकडे काही उमेदवारांचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठीही देवेंद्र फडणवीस यांना जावे लागले. एकाच दिवशी दोन दोन तीन तीन मतदारसंघांत कार्यकर्ता मेळावा, रॅली त्यांना कराव्या लागल्या. सध्या राज्यात महायुतीच्या उमेदवारांकडून देवेंद्र फडणवीस यांना प्रचारासाठी सभा घ्यावी, प्रचार रॅलीत सहभागी व्हावे अशी सर्वाधिक मागणी फडणवीसांची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याखालोखाल फडणवीस यांच्या मागणी असल्याचे कळते. महाराष्ट्रात महायुतीच्या प्रचाराची सर्व धुरा देवेंद्र फडणवीस यांच्या हाती आहे. पहिला आणि दुसरा टप्पा मिळून फडणवीस यांच्या एकूण ४४ सभा झाल्या. तिसऱ्या टप्प्यात आतापर्यंत १० जाहीर सभा त्यांनी घेतल्या. म्हणजे ३० एप्रिलपर्यंत त्यांनी ५४ सभा गाजवल्या आहेत.

निवडणुकीच्या या पर्वात देवेंद्र फडणवीस हे केवळ पाच ते सहा तास झोप घेत असल्याचे कळते. त्यांना दिवसाचे १५ ते १६ तास कार्यरत राहावे लागते. सकाळी नऊ वाजता ते घरातून निघतात. तत्पूर्वी दोन तास ते नागरिक, कार्यकर्त्यांना भेटतात. त्यांचे म्हणणे ऐकून घेतात. दिवसभरातील दौरे, प्रचार सभा, बैठका उरकल्यानंतर रात्री १०.३०पर्यंत आपल्या कार्यलयात थांबतात. त्यानंतर नियोजित राजकीय बैठकांना सुरुवात होते. राजकीय रणनीती आखण्यासाठी रात्रीच्या बैठका वाढल्या आहे. मध्यरात्री एक ते दोन वाजता त्यांचा दिवस संपतो. पुन्हा सकाळी आठ वाजता ते तयार असतात. लोकसभा निवडणुकीचा पहिला आणि दुसरा टप्पा देवेंद्र फडणवीसांसाठी खूपच व्यग्र ठरला. पहिल्या दोन टप्प्यांत रात्रीचा मुक्काम नागपुरात असायचा; पण मुंबईला जाऊन बैठका कराव्या लागायच्या. यावेळी राजकारणाची सूत्रे मुंबईऐवजी नागपुरातून हलली. मुंबईत भाजपचे मुख्यालय आहे; पण फडणवीस मात्र पुण्यातच मुक्काम करणे पसंत करतात. पुण्यातून राज्यभरात कुठेही तत्काळ जाणे शक्य असते. स्वतःचे वेळापत्रक सांभाळत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रत्येक सभेला उपस्थित राहतात.


सम्बन्धित सामग्री