Wednesday, December 04, 2024 02:18:09 PM

पालघरमधून डॉ. हेमंत सावरांना उमेदवारी

पालघरमधून डॉ हेमंत सावरांना उमेदवारी

पालघर, २ मे २०२४, प्रतिनिधी : पालघर लोकसभा मतदारसंघातून भाजपाने डॉ. हेमंत विष्णू सावरा यांना निवडणुकीचे तिकीट दिले आहे. याआधी भाजपातून उद्धव यांच्या पक्षात गेलेले राजेंद्र गावित पालघरचे खासदार होते. महायुतीच्या जागा वाटपात पालघरची जागा भाजपा लढवणार हे निश्चित झाले. यानंतर महायुतीच्यावतीने कोणाला उमेदवारी जाहीर होणार यावरून चर्चेला उधाण आले होते. अखेर उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपायला २४ तासांपेक्षा कमी कालावधी असताना डॉ. हेमंत सावरांना उमेदवारी जाहीर झाली. भाजपाच्या तिकिटावर डॉ. हेमंत सावरा पालघरमधून महायुतीचे उमेदवार म्हणून लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत.

पालघरची लढत

पालघर – डॉ. हेमंत सावरा, भाजपा विरुद्ध भारती कामडी, शिउबाठा विरुद्ध विजया म्हात्रे, वंचित

        

सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo