शेलार यांचा उद्धव आणि राऊतांवर घणाघात

मुंबई, १ मे २०२४, प्रतिनिधी :  मुंबईत दादरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या भव्य सभेत भाजपा मुंबई अध्यक्ष आणि भाजपा नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे. नवनवीन काही गोष्टी आम्हाला समजत आहेत.  बहुरूपी म्हणून काही लोक सापडतात आणि अर्ध्या तासात रंग बदलतात. मुंबईला बहुरूपी कोण आहे. हे माहित आहे. एक नंबरचे बहुरूपी उद्धव ठाकरे […]

शेलार यांचा उद्धव आणि राऊतांवर घणाघात

मुंबई, १ मे २०२४, प्रतिनिधी :  मुंबईत दादरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या भव्य सभेत भाजपा मुंबई अध्यक्ष आणि भाजपा नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे. नवनवीन काही गोष्टी आम्हाला समजत आहेत.  बहुरूपी म्हणून काही लोक सापडतात आणि अर्ध्या तासात रंग बदलतात. मुंबईला बहुरूपी कोण आहे. हे माहित आहे. एक नंबरचे बहुरूपी उद्धव ठाकरे आहेत. तर दुसऱ्या नंबरचे बहुरूपी पत्रकार पोपटलाल आहेत असं म्हणत शेलार यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर घणाघात केला आहे. ज्या काँग्रेसने मराठी माणसांचा खून केला. त्यांच्यासोबत उद्धव ठाकरेंनी हात मिळवणी केली आहे. काँग्रेससोबत युती केली. त्यामुळे मुंबईची जनता चिडलेली आहे. मराठी माणूस दुःखी आहे. मतांसाठी उद्धव यांनी रंग बदलला, बाळासाहेबांच्या विचारावर चालण्याची विनंती करतो असं म्हणत त्यांनी उद्धव यांच्यावर टीका केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number