Wednesday, June 26, 2024 05:38:31 AM

महायुतीचा ठाण्यातला तिढा अखेर सुटला

महायुतीचा ठाण्यातला तिढा अखेर सुटला

ठाणे, १ मे २०२४, प्रतिनिधी: महायुतीकडून ठाणे, कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी अखेर उमेदवारांची घोषणा झाली आहे. कल्याणमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर ठाण्यातून शिंदेंनी माजी महापौर नरेश म्हस्के यांना उमेदवारी दिली आहे.

ठाणे लोकसभेसाठी शिंदेसेनेकडून आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के, मीनाक्षी शिंदे यांच्यासोबत मुख्यमंत्री शिंदेंनी त्यांच्या ठाण्याच्या निवासस्थानी मंगळवारी रात्रीच चर्चा केली. हे चौघेही नेते ठाण्यातून लढण्यास उत्सुक होते. अखेर शिंदेंनी त्यांचे निकटवर्तीय असलेल्या नरेश म्हस्के यांची निवड केली. ठाणे लोकसभेच्या जागेसाठी अर्ज भरायला अवघे तीन दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे इथे प्रचारात शिवसेना मागे पडली आहे


सम्बन्धित सामग्री