मुंबई, ३० एप्रिल २०२४, प्रतिनिधी : शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत न जाता उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिलेल्या राजन विचारे यांना ठाकरेंनी ठाण्यातून पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या होम ग्राऊंडवर राजन विचारे आता शिंदेंच्या उमेदवाराला लढत देणार आहेत.
खासदार राजन विचारे यांच्या संपत्तीमध्ये मागील पाच वर्षात दहा कोटीची वाढ झाली आहे. कर्ज सव्वा तीन कोटी असून तीन गुन्हे कमी झाले असल्याचे त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञा पत्रात नमूद करण्यात आले आहे.
विचारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्या संपत्तीची माहिती प्रतिज्ञा पत्रात दिली आहे. त्यांच्याकडे एक लाख २० हजाराची रोकड आहे तर पत्नी नंदिनी विचारे यांच्याकडे ६० हजाराची रोकड आहे. जंगम मालमत्ता एक कोटी ३२ लाख ५५ हजार, तर पत्नीकडे दोन कोटी ४० लाख, स्थावर मालमत्ता पाच कोटी ६४ लाख ४५ हजार तर पत्नीकडे ७४ लाख ५६ हजार, खा.विचारे यांच्यावर तीन कोटी २४ लाख ७८ हजाराचे कर्ज आहे ,तर त्यांच्या पत्नीवर ९४ लाख २० हजाराचे कर्ज आहे.
वारसा हक्काने १६ लाख ९४ हजाराची संपत्ती मिळाली असून खा. विचारे यांच्या विरोधात सहा गुन्हे दाखल आहेत. पाच वर्षापूर्वी त्याची संख्या नऊ होती. विचारे यांच्याकडे एक चार चाकी गाडी आहे तर पत्नीकडे दोन गाड्या आहेत रत्नागिरी आणि अलिबाग येथे शेत जमीन तर सरळ येथे घर तर शहरातील विविध भागात खासदार विचारे आणि त्यांच्या पत्नीकडे सहा दुकाने आहेत. मागील वर्षी त्यांची एकूण संपत्ती १४ कोटी ५९ लाख ८० हजार इतकी होती. त्यांचे शिक्षण एफ वाय जे सी पर्यंत झाले असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.
राजन विचारे यांची मालमत्ता (सविस्तर )
२०१९ मध्ये
एकूण संपत्ती १४, ५९, ८०, १९८
जंगम मालमत्ता - २,०१,१५,२००
पत्नी नंदिनी - २,८२,९३, ३६३
रोख रक्कम - २,००,०००
वारसा हक्काने - ९०००००
कर्ज - ४,१८,५७,४६१
गुन्हे - ९ फौजदारी गुन्हे
वाहने - फोर्ड एंडेवर, मर्सिडीज बेंझ, पत्नी नंदीनीच्या नावे टोयोटा फोर्चुनर, इनोव्हा क्रीयस्टा, महिंद्रा स्कॉर्पिओ.
शेती - रत्नागिरी येथील पोमेंडी आणि अलिबाग येथील अक्शी येथे शेतजमीन.
सदनिका - ठाण्यातील चरई भागातील रोझ वुड आणि जय जगदंबा अपार्टमेंटमध्ये दुकान, पत्नी नंदिनीच्या नावे जांभळीनाका येथील आत्माराम टॉवरमध्ये दुकान, जय जगदंबा अपार्टमेंटमध्ये दुकान, चेंदणी येथील ठाकूरनिवासमध्ये दुकान.
शिक्षण - एफ.वाय.जे.सी
२०२४
एकूण संपत्ती - २५,८२,९७,०००
रोख रक्कम - १,२०,०००
पत्नीकडे - ६०, ०००
जंगम - १,३२, ५५, १२५
पत्नीकडे २,४०,३२,५०२
स्थावर - ५,६४,४५,५०३
पत्नीकडे - ७४,५६,४२०
कर्ज - ३,२४,७८,८८४
पत्नीकडे - ९४,२०, २३२
वारसा हक्काने - १६,९४,६३१
गुन्हे - ६ फौजदारी गुन्हे
वाहने - राजन विचारे यांच्याकडे हुंदाई वेरणा, पत्नी नंदीनीच्या नावे इनोव्हा क्रीयस्टा, महिंद्रा स्कॉर्पिओ.
शेती - रत्नागिरी येथील पोमेंडी आणि अलिबाग येथील अक्शी येथे शेतजमीन.
सदनिका - ठाण्यातील चरई भागातील रोझ वुड, दिघे चौकात दुकान, मिरा-भाईंदर येथील गौरव गार्डन येथे दोन दुकान, पत्नी नंदिनीच्या नावे जांभळीनाका येथील आत्माराम टॉवरमध्ये दुकान, चेंदणी येथील ठाकूरनिवासमध्ये दुकान.