Friday, June 28, 2024 04:42:27 PM

मोदींवर बोलायची उद्धव यांची लायकी नाही : रामदास कदम

मोदींवर बोलायची उद्धव यांची लायकी नाही  रामदास कदम

छत्रपती संभाजीनगर, २८ एप्रिल २०२४ , प्रतिनिधी : देशात लोकसभेची रणधुमाळी सुरु आहे. दरम्यान शिवसेना नेते रामदास कदम यांची भाषणं सध्या समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहेत. अशातच आता त्यांनी उद्धव ठाकरे काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी , केंद्रीय मंत्री अमित शाहयांच्यावर टीका करण्याची उद्धव ठाकरे यांची लायकी आहे का? आदित्य ठाकरेंचेनाव बलात्काराच्या गुन्ह्यात पुढे आले तेव्हा तुम्ही पंतप्रधानांना मागच्या दाराने गुपुचूप भेटायचे आणि आता त्यांनाच शिव्या देत आहात, अशी घणाघाती टीका शिवसेना नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा मला काँग्रेस सोबत जायची वेळ येईल तेव्हा माझे दुकान बंद करून टाकेल असे सांगितले होते.
मात्र नालायक उद्धव ठाकरे काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले सोनिया गांधीचे पाय चाटतोय, आणि देशाच्या पंतप्रधान शिव्या घालतोय लाज वाटत नाही , स्वतःच्या वडिलांच्या पाठीत खंजीर खुपसणारी अवलाद उद्धव ठाकरे आहे. मातोश्री आमचे दैवत होते, विजय उमेदवाराची मासाहेब आरती करायचे , आता काय चाललय त्या मातोश्री मध्ये काय चाललाय , देशाचे पंतप्रधान अमित शहा यांच्यावर टीका करण्याची उद्धव ठाकरे यांची लायकी आहे का. कुणावरती बोलताय सूर्या कडे बघून ठोकल्यावर थुकी तोंडावर पडते उद्धव ठाकरे यांनी लक्षात ठेवावे.

स्वतःच्या मुलावर आदित्य ठाकरे वर जेव्हा प्रसंग आला बलात्काराच्या गुन्ह्यात त्याचे नाव पुढे आले तेव्हा मात्र याच पंतप्रधानांना मागच्या दाराने गपचूप जाऊन उद्धव ठाकरे भेटले, माझ्या मुलाला वाचवा म्हणून गपचूप जाऊन भेटताय आणि आज त्यांना तुम्ही शिव्या घालत आहे.तुम्ही कोणाबद्दल बोलत आहे देशाच्या पंतप्रधानाबद्दल तुमची लायकी तरी आहे का अशा शब्दात रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली

रायगड लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ दापोली विधानसभा मतदारसंघातील केळशी , आसोंड, तेरेवायंगणी, पाजपंढरी येथे जाहीर सभा पार पडल्या या जाहीर सभेत शिवसेना नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला


सम्बन्धित सामग्री