Friday, July 05, 2024 02:36:00 AM

संभाजी नगरमध्ये तिसऱ्या दिवशी ११ उमेदवारी अर्ज

संभाजी नगरमध्ये तिसऱ्या दिवशी ११ उमेदवारी अर्ज

संभाजी नगर, २१ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीच्या अर्ज वितरणाला १८ एप्रिलपासून सुरुवात झाली. आतापर्यंत ९५ जणांनी १८५ उमेदवारी अर्ज घेतले आहेत, तर तिसऱ्या दिवशी शनिवारी ११ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये अपक्ष उमेदवारांची संख्या जास्त आहे.

पहिल्याच दिवशी अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. शनिवारी तिसऱ्या दिवसअखेर ११ उमेदवारी अर्ज दाखल केले असून, यामध्ये हर्षवर्धन जाधव यांच्या तिसऱ्या अर्जाचा समावेश आहे. शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये मनीषा ऊर्फ मंदा खरात (बहुजन महापार्टी), खान एजाज एहमद मो. बिस्मिल्लाह खान (अपक्ष), सुरेश आसाराम फुलारे (अपक्ष), ख्वाजा कासीम शेख (अपक्ष), बबनगीर उत्तमगीर गोसावी (हिंदुस्थान जनता पार्टी), किरण सखाराम बर्डे (अपक्ष), हर्षवर्धन जाधव, देविदास रतन कसबे असे शनिवारी ११ जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. आतापर्यंत तीन दिवसांत ९५ इच्छुकांनी १८५ नामनिर्देशनपत्रे नेली. गुरुवारी (ता. १८) पहिल्या दिवशी ६० इच्छुकांनी ११८, दुसऱ्या दिवशी शुक्रवारी २५ इच्छुकांनी ५३, तर शनिवारी (ता. २०) १० इच्छुकांनी १४ असे ९५ इच्छुकांनी १८५ नामनिर्देशनपत्रे नेली असल्याचे निवडणूक विभागातून सांगण्यात आले.


सम्बन्धित सामग्री