नाशिक ,२१ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : नाशिक लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी महायुतीकडून अद्याप जाहीर झाली नसल्याममुळे युतीचा उमेदवार कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. काल (२१ एप्रिल २०२४) मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा मतदार संघातून उमेदवारी न करण्याचा निर्णय घेतल्याने नाशिकची जागा ही शिंदेंच्या शिवसेनेला सुटणार अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे तिसऱ्यांदा इच्छुक आहे तर जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी देखील पक्षाने आदेश दिला तर निवडणूक लढवणार अशी भूमिका घेतली आहे. उमेदवारी जाहीर झाली तर उमेदवार न बघता आमच्यासाठी धनुष्यबाण हा उमेदवार असेल आणि आम्ही शिवसेनेचा बालेकिल्ला राखून ठेवून विजय मिळवू अशी प्रतिक्रिया जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी दिली आहे. तर आता नाशकातून उमेदवार कोण असेल याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत.