Monday, July 01, 2024 02:57:13 AM

बारामती मतदारसंघात उमेदवारी अर्जाची छाननी  सुरू

बारामती मतदारसंघात उमेदवारी अर्जाची छाननी  सुरू

पुणे, २० एप्रिल २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी उमेदवारी अर्जाची छाननी सुरू आहे. निवडणुक आयोगाकडून  सुप्रिया सुळे यांचा अर्ज मंजूर तर डमी भरलेल्या सचिन दोडकेचा अर्ज नामंजू करण्यात आला. मात्र सचिन दोडके यांनी अपक्ष म्हणून भरलेला अर्ज मंजूर करण्यात आला. दुसरीकडे अजित पवार यांच्या उमेदवारी अर्ज नामंजूर झाला तर सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज मंजूर करण्यात आला. बारामती मतदारसंघातील अर्जाची छाननी करण्यासाठी अनेक उमेदवारांना बोलावण्यात आलं. एका पक्षाचे दोन अर्ज असल्याने एक अर्ज नामंजूर करण्यात येत आहे. यामध्ये पहिला अर्ज आलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाते. बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुनेत्रा पवार विरूद्ध राशपकडून सुप्रिया सुळे अशी लढत पाहायला मिळणार आहे.  


सम्बन्धित सामग्री