Monday, July 01, 2024 02:18:33 AM

मुरलीधर मोहोळ यांच्यावर आचारसंहिता भंगाची कारवाई

मुरलीधर मोहोळ यांच्यावर आचारसंहिता भंगाची कारवाई  

पुणे, १९ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : महायुतीचे पुण्यातील उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात आचारसंहिता भंगची तक्रार काँग्रेस पक्षाने केली आहे. निवडणूक प्रचारात प्रभू श्रीरामांचे फोटो वापरल्याचा काँग्रेसकडून मोहोळांवर आरोप करण्यात आला आहे. काँग्रेसकडून मुरलीधर मोहोळ यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे दाखल केली आहे.

काँग्रेसकडून केलेल्या तक्रारीवर मुरलीधर मोहोळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसचा प्रभू श्रीराम द्वेष पुन्हा अधोरेखित झाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. काँग्रेसचं खरं रुप या तक्रारीमुळे पुणेकरांसमोर आलं. काँग्रेसने कायम प्रभू श्रीरामाला विरोध केला आहे अशा हजार तक्रारी करा म्हणत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.


सम्बन्धित सामग्री