Sunday, October 06, 2024 04:24:02 AM

महाराष्ट्रात पाच मतदारसंघात मतदान सुरू

महाराष्ट्रात पाच मतदारसंघात मतदान सुरू

विदर्भ, १९ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : अठराव्या लोकसभेसाठी होत असलेल्या मतदानासाठी पूर्व विदर्भ सज्ज झाला आहे. नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या पाच मतदारसंघात शुक्रवारी मतदान होत आहे. या मतदारसंघांत ९७ उमेदवार लढत असून ९४ लाख ४६ हजारावर मतदार आहेत. किमान ७५ टक्के मतदान व्हावे, यासाठी प्रशासनाने विविध पातळ्यांवर प्रयत्न केले. या प्रयत्नांना कसा प्रतिसाद मिळतो याविषयीही उत्सुकता आहे. मतदानाच्या पूर्वसंध्येला गुरुवारी एकूण १० हजार ६५२ मतदान केंद्रांवर मतदानाच्या साहित्यसह निवडणूक कर्मचारी पोहोचले. प्रशासन आणि राजकीय पक्ष या निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत.

सर्वाधिक २,४०५ मतदान केंद्रे रामटेक मतदारसंघात आहेत. नागपूरमध्ये २,१०५, भंडारा-गोंदियात २,१३३, गडचिरोली-चिमूरमध्ये १,८९१; तर चंद्रपूर मतदारसंघात एकूण २,११८ मतदान केंद्रे आहेत. माओवादग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात अधिकचा बंदोबस्त आहे. संवेदनशील भागात पुरेश काळजी घेतली जात आहे.


सम्बन्धित सामग्री