Friday, July 05, 2024 01:06:29 AM

लोकसभा निवडणुकांसाठी दहा हजारांवर पोलिसांचा बंदोबस्त

लोकसभा निवडणुकांसाठी दहा हजारांवर पोलिसांचा बंदोबस्त

नागपूर, प्रतिनिधी, दि. १७ एप्रिल २०२४ : लोकसभा निवडणूका आता काहीच दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. येतं २०२४ चं वर्ष राजकारणातील मोठी घडामोड घडवणारं ठरेल असं म्हंटलं जातंय. याच निवडणुकांच्या पार्शवभूमीवर लोकसभा मतदान प्रक्रियेपासून तर निकालापर्यंत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त राहणार आहे. नागपूर आणि रामटेक या दोन्ही मतदारसंघात दहा हजारांच्यावर पोलिस अधिकारी, कर्मचारी, निमलष्करी दल, केंद्रीय सशस्त्र दलाचा बंदोबस्त असणार आहे. कळमन्यातील स्ट्राँग रूमला सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह तीन स्तरीय पोलिसांचे सुरक्षा कवच राहणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल आणि पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

तीन अप्पर पोलिस आयुक्त यांच्या देखरेखीत १० पोलिस उपायुक्त, १७ सहाय्यक पोलिस आयुक्त, पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक असे एकूण ३२१ पोलिस अधिकारी तसेच ३ हजार २१८ पोलिस अंमलदार व ९४३ महिला पोलिस व साध्या वेशातील पोलिसही बंदोबस्तात असतील.

                          

सम्बन्धित सामग्री