Monday, September 09, 2024 06:01:39 PM

धैर्यशील माढातून लढणार ?

धैर्यशील माढातून लढणार

मुंबई, १३ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपातील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. ते रविवारी राशपात प्रवेश करणार आहेत. राशपात प्रवेश केल्यानंतर त्यांना पक्षाकडून माढा लोकसभा मतदारसंघाचे तिकीट दिले जाण्याची शक्यता आहे. भाजपाने माढातून रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी मिळाल्यामुळे नाराज झालेल्या धैर्यशील मोहिते पाटील यांनी राशपाकडून लोकसभेची निवडणूक लढवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मोहिते पाटील यांना राशपाने उमेदवारी दिली तर माढा लोकसभा मतदारसंघात भाजपाचे रणजीतसिंह नाईक-निंबाळकर विरुद्ध राशपाचे धैर्यशील मोहिते पाटील विरुद्ध वंचितचे रमेश नागनाथ बारसकर अशी लढत होईल. माढा लोकसभा मतदारसंघासाठी ७ मे रोजी निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात मतदान होईल आणि ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. फलटणच्या रघुनाथराजे निंबाळकर यांनी रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांच्याऐवजी धैर्यशील मोहिते पाटील यांचा प्रचार करणार असल्याचे जाहीर केले आहे.

माढ्यावरून राशपात फूट

राशपकडून धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सुरू झाल्यापासून नाराज असलेल्या अभय पाटील यांनी बंड करण्याचा निर्मय घेतला आहे. ते राशपमधून बाहेर पडून अपक्ष म्हणून माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत.


सम्बन्धित सामग्री