Sunday, July 07, 2024 10:10:47 PM

साताऱ्यात माथाडी भिडणार

साताऱ्यात माथाडी भिडणार

सातारा, १२ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यामध्ये जसं उन्हान वातावरण तापला आहे तसेच साताऱ्यातील राजकारण सुद्धा आत्ता मोठ्या प्रमाणात तापू लागला आहे याचं कारण सुद्धा तसंच आहे कारण गेले बरेच दिवस झाले सातारा जिल्ह्यात उमेदवार कोण हा विषय मोठ्या प्रमाणात चर्चला जाऊन लागला होता. महाविकास आघाडी असो किंवा महायुती यांनी साताऱ्यातील उमेदवाराबाबत मोठी गोपनीयता पाळलेले दिसून आली. आज उमेदवार जाहीर करु उद्या उमेदवार जाहीर करु असं करता करता लोकसभेची अर्ज भरण्याची तारीख जवळ आली तरीसुद्धा कोणत्याच पक्षाने आपला उमेदवार जाहीर केला नव्हता त्यामुळे साताऱ्यातील राजकीय वातावरण तापलं होतं.

आता मात्र या चर्चांना महाविकास आघाडी कडून पूर्णविराम देण्यात आला आहे कारण सातारा जिल्ह्यासाठी राशप गट यांच्याकडून शशिकांत शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल आहे. तसं बघायला गेलो तर महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील बाळासाहेब पाटील सारंग पाटील यांची सुद्धा नाव आघाडीवर होती. परंतु विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी आपल्या तब्येतीच कारण देऊन आपण ही निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केलं त्यानंतर मात्र साताऱ्यात कोण लढणार हा मुद्दा कळीचा झाला होता त्यातच काही दिवसापूर्वी कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांनी कोण लढतंय का बघा नाहीतर मी लढायला तयार आहे असं सांगितलं होतं. त्यानंतर शरद पवार यांची साताऱ्यात पत्रकार परिषद झाली यामध्ये सुद्धा शरद पवारांनी आपल्या उमेदवाराबद्दल स्पष्ट काही सांगितलं नव्हतं पत्रकारांनी खोदून विचारल्यानंतर माझ्या डाव्या बाजूला शशिकांत शिंदे आणि उजव्या बाजूला बाळासाहेब पाटील आहेत यापैकी कोणालातरी उमेदवारी देणार असं जाहीर केलं होतं.

शशिकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर झालेले आहे आणि ते साताऱ्यात येऊन जसं तुम्ही शक्तिप्रदर्शन केलं होतं तसंच शशिकांत शिंदे सुद्धा करणार आहेत आणि त्यांचा अर्ज भरण्यासाठी शरद पवार येणार असल्याचं पत्रकारांनी उदयनराजेंना विचारल्यानंतर उदयनराजे यांनी शरद पवारांनी का साताऱ्यात येऊ नये अस मिश्किल उत्तर देत शक्ती प्रदर्शनाबाबत चांगला आहे मोठं करावं आणखीन मोठं करावं लोक तरी जमली पाहिजेत असे उत्तर दिलं.

सातारा लोकसभा निवडणुकीसाठी सध्या महायुतीकडुन इच्छुक असणाऱ्या कोणालाही अद्याप उमेदवारी देण्यात आलेली नाही. महायुतीची उमेदवारी आपल्याला मिळावी यासाठी खासदार उदयनराजे भोसले, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, पुरुषोत्तम जाधव अन्य काही जणांनी प्रयत्न सुरु केले आहेत. असे असताना महायुतीच्या कऱ्हाडमधील मेळाव्यात नरेंद्र पाटील यांनी थेट खासदार उदयनराजे भोसले यांच्या समोरच सातारा लोकसभा लढण्याची इच्छा व्यक्त करुन आमचे दिल्लीत कोणीही नाही मात्र आम्ही मुंबईत सागर बंगल्यावर जातो अशी टिप्पणी करुन उपस्थितांचे लक्ष वेधले.

मुंबई येथे राशप गटाकडून शशिकांत शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं त्यानंतर शशिकांत शिंदे यांचं गाव असलेल्या जावलीमध्ये जल्लोष करण्यात आला. महायुतीकडून मात्र अजूनपर्यंत अधिकृत उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. अमित शहा यांची भेट घेऊन उदयनराजे यांनी सातारा शहरात मोठे शक्ती प्रदर्शन करत प्रवेश केला. त्यानंतर मात्र त्यांनी आपल्या पायाला भिंगरी बांधत सातारा जिल्ह्यामध्ये आपल्या सभांचे तसेच कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीवर जोर देऊन आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. जरी अधिकृत उमेदवारी मिळाली नसली तरी सुद्धा महायुतीकडून सर्वांनीच उदयनराजे भोसले यांचा प्रचाराला सुरुवात केली आहे आणि तसं सभांना सर्व नेते दिसत आहेत.

साताऱ्यात राजकीय वातावरण तापलेला असताना आज शशिकांत शिंदे यांची उमेदवारी महाविकास आघाडीने जाहीर केलेली असली तरी उदयनराजेंकडून आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार शंभूराज देसाई ,आमदार महेश शिंदे यांनी कंबर कसलेले असून शशिकांत शिंदे यांना त्यांनी केलेल्या कामाच्या जोरावर ही निवडणूक सामोरे जावे लागणार असून ही लढाई अटीतटीची होणार आहे असं राजकीय विश्लेषक शरद काटकर यांनी सांगितले.

एकूणच साताऱ्यात महाविकास आघाडीचा उमेदवार ठरलेला असून महायुतीकडून मात्र अद्यापही उमेदवार ठरलेला नसला तरी उदयनराजे यांचे नाव निश्चित झाल्याचं सूत्रांकडून समजत आहे त्यामुळे आता ही लढत उदयनराजे आणि शशिकांत शिंदे यांच्यातच होणार असं दिसत आहे. दोन्हीही दिग्गज नेते असल्याने ही निवडणूक मात्र चुरशीची होणार हे चित्र निर्माण झाला आहे.


सम्बन्धित सामग्री