Thursday, July 04, 2024 09:38:11 AM

मोदींचे नेतृत्व खंबीर - राज

मोदींचे नेतृत्व खंबीर - राज

मुंबई, ९ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : भारत हा तरुणांचा देश आहे. जगातील सर्वाधिक तरुण भारतात आहेत. यामुळे यंदाची निवडणूक देशाला दिशा देणारी आहे. या अशा वातावरणात देशाला खंबीर आणि सक्षम नेतृत्वाची आवश्यकता आहे. नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व खंबीर आहे. यामुळेच फक्त नरेंद्र मोदी यांच्यासाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याची घोषणा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली. ते मुंबईत गुढी पाडव्या निमित्त शिवाजी पार्क येथे घेतलेल्या सभेत बोलत होते. विधानसभेसाठी तयारीला लागा, असा आदेश पण राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना दिला. राज यांच्या या वक्तव्यामुळे मनसे लोकसभेची २०२४ ची निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

मनपाच्या निवडणुकांचा पत्ता नाही – राज
रुग्णसेवकांना निवडणुकांचे काम कशाला? – राज
राज ठाकरेंचा रुग्णसेवकांना आदेश
रुग्णसेवकांनी निवडणुकांचे काम करू नये – राज
भेटीत काही घडलं तर सांगेन – राज
अमित शाह यांच्या भेटीबाबत बोलले राज
शिवसेना प्रमुख व्हायचे असते तर, तेव्हाच झालो असतो – राज
‘मी कुणाच्याही हाताखाली काम करणार नाही’
मी मनसेतच राहणार – राज ठाकरे
मला जागावाटपाच्या चर्चेत रस नाही – राज
सोबत येण्याचा प्रस्ताव शिंदेंचा – राज
सोबत येण्यासाठी शिंदे आग्रही – राज
भाजपासोबत माझा संपर्क जुनाच – राज
भारतात तीस वर्षांनी कुणाला बहुमत मिळालं – राज
मोदी सरकारकडून विश्वासाला तडा गेला – राज
मोदी सरकारने विश्वास गमावला तेव्हा टीका केली – राज
उद्धव भाजपासोबत सत्तेतला मलिदा चाटत होते – राज
सत्ता गेल्याने उद्धव मोदींविरोधात – राज
यंदाची निवडणूक देशाला दिशा देणारी – राज
‘फोडाफोडीच्या राजकारणाला थारा देऊ नका’
राज ठाकरेंचे मतदारांना आवाहन
फक्त मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा – राज


सम्बन्धित सामग्री