Sunday, July 07, 2024 12:20:31 AM

ज्योती मेटे यांना सर्वांनीच नाकारले

ज्योती मेटे यांना सर्वांनीच नाकारले

बीड, ८ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : बीड लोकसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी महाविकास आघाडीकडून शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष दिवगंत विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांच्या नावाची चर्चा होती. मात्र राशपने या मतदारसंघात बजरंग सोनवणे यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर ज्योती मेटे यांना वंचितकडून ऑफर देण्यात आली आहे त्या वंचितच्या उमेदवार म्हणून बीड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील अशा चर्चा असताना वंचितनेही बीडमधून उमेदवार घोषित केला आहे त्यामुळे ज्योती मेटे यांना सर्वांनीच नाकारले असं चित्र आहे.

बीडमध्ये अशी होणार लढत

पंकजा मुंडे उमेदवार भाजपा
बजरंग सोनावणे उमेदवार राशप
अशोक हिंगे उमेदवार वंचित

बीड लोकसभा मतदारसंघात आघाडीवर असणाऱ्या ज्योती मेटे यांना सर्वांनीच डावले सुरुवातीला महाविकास आघाडीने ज्योती मेटे यांच्याशी उमेदवारी संदर्भामध्ये चर्चा केली आणि ज्योती मेटे यांचे नाव महाविकास आघाडीकडून आघाडीवर राहिले मात्र काही काळानंतर अजित पवार गटामध्ये असणारे बजरंग सोनवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटात प्रवेश केला आणि त्यानंतर बजरंग सोनवणे यांना बीड लोकसभेची उमेदवारी देण्यात आली त्यामुळे नाराज ज्योती मेटे यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा आणि संवाद साधून लोकसभा संदर्भामध्ये निर्णय घेणार असल्याचे घोषित केलं.

दिवंगत मराठा नेते विनायक मेटे यांच्या पत्नी तथा शिवसंग्राम संघटनेच्या अध्यक्षा ज्योती मेटे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. याची घोषणा ज्योती मेटे यांनी आधीच केली आहे मग आता महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवारी न मिळाल्यानंतर वंचितच्या दारी पण काही न मिळालेल्या ज्योती मेटे बीड मधून अपक्ष निवडणूक लढवू शकतात आणि तोच एकमेव पर्याय त्यांच्याकडे शिल्लक राहतो.

एका बाजूला ज्योती मेटे यांचा कार्यकर्त्यांची संवाद सुरू असताना वंचित बहुजन आघाडीने देखील आपला उमेदवार जाहीर केला वंचित बहुजन आघाडीने मराठवाड्याचे अध्यक्ष असलेले अशोक हिंगे पाटील यांना बीड लोकसभेची उमेदवारी दिली मात्र सुरुवातीला ज्योती मिळते यांना वंचित बहुजन आघाडी कडून देखील विचारणा करण्यात आली होती मात्र या सर्व उमेदवारीनंतर ज्योती मेटे यांच्या निर्णयाकडे आता संपूर्ण बीड लोकसभा मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.

ज्योती मेटे सध्या बीड जिल्ह्यातील कार्यकर्त्याची संवाद साधतायेत आणि सर्वसामान्य लोकांच्या भेटीगाठी घेत आहेत. या भेटीगाठी नंतर आपण निर्णय घेऊन लोकसभा निवडणूक अपक्ष लढवायची का याची चाचपणी सध्या ज्योती मेटे करत आहेत. ज्योती मेटे आता महायुतीला पाठिंबा देणार की स्वतः अपक्ष निवडणूक लढवणार हे येत्या काळात स्पष्ट होणार….

     

सम्बन्धित सामग्री