Monday, July 01, 2024 02:37:14 AM

भाजपाचा १० लाख मतदारांपर्यंत पोहचण्याचा उपक्रम

भाजपाचा १० लाख मतदारांपर्यंत पोहचण्याचा उपक्रम


पुणे, ७ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टीच्या वर्धापन दिनानिमित्त पुणे शहरात रविवारी हर घर मोदी परिवार जनसंपर्क अभियान राबवण्यात आले. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते एकाच दिवसात पुणे लोकसभेतील अडीच लाख घरांमध्ये पोहोचत असून १० लाख नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. या अभियानात पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ सहभागी झाले आहेत. होळ यांनी कोथरुडच्या लक्ष्मीनगर वसाहतीतील घरोघरी पोहोचून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी समर्थन मागितले यावेळी घरोघरी मोहोळ यांचे औक्षण करून लोकांकडून त्यांचे स्वागत करण्यात आले.


सम्बन्धित सामग्री