Monday, September 09, 2024 05:57:05 PM

राशपच्या उमेदवारांची दुसरी यादी

राशपच्या उमेदवारांची दुसरी यादी

मुंबई, ४ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : शरद पवारांच्या राशपने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीद्वारे दोन उमेदवार जाहीर करण्यात आले. बीडमधून बजरंग सोनावणे आणि भिवंडीतून सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांना राशपने उमेदवारी जाहीर केली. या घोषणेनंतर राशपने लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या उमेदवारांची संख्या सात झाली आहे. राशपने अद्याप माढा, सातारा येथील उमेदवार जाहीर केलेले नाही.

राशपचे लोकसभा निवडणुकीसाठीचे उमेदवार

१. वर्धा - अमर काळे (मतदान २६ एप्रिल २०२४)
२. बारामती - सुप्रिया सुळे (मतदान ७ मे २०२४)
३. शिरुर - अमोल कोल्हे (मतदान १३ मे २०२४)
४. अहमदनगर - निलेश लंके (मतदान १३ मे २०२४)
५. बीड - बजरंग सोनावणे (मतदान १३ मे २०२४)
६. दिंडोरी - भास्कर भगरे (मतदान २० मे २०२४)
७. भिवंडी - सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे (मतदान २० मे २०२४)

अशी असेल लढत

१. वर्धा – रामदास तडस, भाजपा विरुद्ध अमर काळे, राशप विरुद्ध प्रा. राजेंद्र साळुंके, वंचित
२. बारामती – सुनेत्रा पवार, राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध सुप्रिया सुळे, राशप विरुद्ध महेश भागवत, ओबीसी बहुजन
३. शिरुर – शिवाजीराव आढळराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध अमोल कोल्हे, राशप, मंगलदास बागुल, वंचित
४. अहमदनगर – सुजय विखे पाटील, भाजपा विरुद्ध निलेश लंके, राशप
५. बीड – पंकजा मुंडे, बीड, भाजपा विरुद्ध बजरंग सोनावणे, राशप
६. दिंडोरी – भारती पवार, भाजपा विरुद्ध भास्कर भगरे, राशप
७. भिवंडी – कपिल पाटील, भाजपा विरुद्ध सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे, राशप


सम्बन्धित सामग्री