Thursday, July 04, 2024 09:28:27 AM

संजय निरूपम यांचे काँग्रेसकडून निलंबन

संजय निरूपम यांचे काँग्रेसकडून निलंबन

मुंबई, ४ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : काँग्रसने संजय निरूपम यांना बुधवारी रात्री प्रसिद्धीपत्रक काढत पक्षातून काढण्यात आलं. पक्षविरोधी भूमिका घेतल्याने सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले असल्याचे या पत्राद्वारे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने म्हटले आहे.काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस के.सी.वेणुगोपाल यांनी सही करत या निर्णयाला मंजुरी दिली आहे. पक्षाने अचानक निरूपम यांना पक्षातून काढल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी संध्याकाळी निरूपम यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर निरूपम यांनी एक ट्विट केलं. काँग्रेसने माझ्यासाठी ऊर्जा आणि स्टेशनरी खर्च करू नये. पक्ष वाचवण्यासाठी काँग्रेसने ऊर्जा आणि स्टेशनरीचा वापर करावा, तसाही पक्ष भीषण आर्थिक संकटात आहे. मी एक आठवड्याची मुदत दिली होती, ती संपली आहे. आज मी स्वत: निर्णय घेणार आहे असे या ट्विटमध्ये त्यांनी नमूद केले होते. म्हणजेच काँग्रेस पक्षाने निलंबित केले नसते तरी गुरूवारी त्यांनी स्वत:च राजीनामा दिला असता अशा राजकीय चर्चा सर्वत्र आहे.


सम्बन्धित सामग्री